देऊळबंद
काही भक्त डोळस तर,
काही भक्त अंध आहेत.
ज्याच्याकडे धावा करावा,
त्याचेही दारे आता बंद आहेत.
भक्तांबरोबरच देवस्थानांनाही,
कोरोनाचा खतरा आहे.
कोरानाच्या तडाख्यात,
उरूस,जत्रा आणि यात्रा आहे.
कोरोनातून सोडवायला,
कुणाचेच देव पावले नाहीत !
तरी बरे भक्तांनी अजून तरी,
देवांनाच मास्क लावले नाहीत !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा