गुरुवार, २९ जून, २०२३

*भिडे याच्यावर कार्यवाही साठी दलित महासंघाचे निवेदन -विकास बल्लाळ*

 *भिडेवर देशद्रोहाचा       गुन्हा नोंद करा_ विकास बल्लाळ यांची मागणी*
(हादरा न्युज नेटवर्क  ) इस्लामपूर ः भिडे यांचा एक व्हिडिओ नुकताच समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे.यामध्ये त्यांनी अत्यंत असभ्य आणि अश्लाघ्य भाषेमध्ये स्वातंत्र्य दिन व भारतीय ध्वज याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, स्वातंत्र्य हे 'हांडगे' स्वातंत्र्य आहे. १५ ऑगस्टला तिरंगा  नावापुरता घ्या, परंतु भगवा झेंडा मोठा घेऊन मिरवणूक काढा.या त्यांच्या वक्तव्यातून तमाम भारतीय नागरिकांच्या भावना दुखावल्या असून भारतीय संविधानाने निर्देश केल्याप्रमाणे भारतीय ध्वज व राष्ट्रगीत या राष्ट्रीय प्रतीकांचे  अवमूल्यन आणि अवमान या संभाजी भिडे नावाच्या इसमाने केला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनी कडकडीत उपास करा असेही त्याने म्हटले आहे.हीअत्यंत गंभीर गोष्ट आहे. राष्ट्रीय प्रतीक असलेल्या भारतीय ध्वज व जनगणमन या राष्ट्रगीता बद्दल त्यांनी जे अकलेचे तारे तोडले आहेत ते कोणत्याही भारतीय नागरिकाला मान्य होणारे नाहीत.संभाजी भिडेच्या या वक्तव्यातून देशासाठी प्राणार्पण केलेल्या शहीद क्रांतिकारकांचा ,राष्ट्रीय महापुरुषांचा व स्वातंत्र्य चळवळीतील सर्व सहभागी क्रांतीवीरांचा अपमान झालेला आहे. त्यामुळे  तमाम भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत .दलित महासंघाच्या वतीने आम्ही या निवेदनाद्वारे आपल्याकडे अशी मागणी करतो की, संभाजी भिडे नावाच्या या विकृत माथेफिरुवर राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत या राष्ट्रीय प्रतीकांचे अवमूल्यन आणि अपमान केल्याबद्दल आणि समाजामध्ये तेढ निर्माण केल्याबद्दल ,भारतीय नागरिकांच्या भावना दुखावल्याबद्दल तातडीने देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात यावा. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास दलित महासंघाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू याची नोंद घ्यावी.
दलित महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष विकास बल्लाळ, रवि बल्लाळ सांगली जिल्हा संघटक, संतोष नवाळे सांगली जिल्हा कायदा सल्लागार, रमेश सकटे इस्लामपूर शहर अध्यक्ष, अमित पाटोळे शहर उपाध्यक्ष, प्रयाग भिसे युवक शहर अध्यक्ष

मंगळवार, ३० मे, २०२३

डॉ.शंकरदादा माने यांच्या वाढदिवसानिमित्त कवठेमहांकाळ मध्ये विविध कार्यक्रम संपन्न*

 *डॉ.शंकरदादा माने यांच्या वाढदिवसानिमित्त कवठेमहांकाळ मध्ये विविध कार्यक्रम संपन्न* 


बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव मा. डॉ शंकरदादा माने यांच्या वाढदिवसानिमित्त कवठे महांकाळ तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमाचे नियोजन केले होते या कार्यक्रमांमध्ये प्रमुख्याने भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या त्याचप्रमाणे गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, त्याचप्रमाणे डान्स स्पर्धेचे नियोजन केले होते या कार्यक्रमाला सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक महाराष्ट्रातील दिग्गज व प्रसिद्ध संघांनी भाग घेतला व गोरगरिबांचा आधार असलेले गरिबाच्या कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणारे मा. डॉ शंकरदादा माने यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक गोरगरीब गरजू लोकांनी डॉ. शंकर माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिला या कार्यक्रमाचे खास आकर्षण क्रिकेट स्पर्धेची बक्षिसे होती पहिल्या क्रमांक पटकावणाऱ्या संघासाठी 51 हजार व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी 30 हजार व आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांकासाठी  20 हजार, व आकर्षक ट्रॉफी, तसेच चौथे क्रमांक 15 हजार व आकर्षक ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल, तर उत्कृष्ट बॅट्समन साठी बॅट, उत्कृष्ट गोलंदाज साठी बूट, असे बक्षीस होते त्याचप्रमाणे डान्स स्पर्धेसाठी विविध आकर्षक अशी बक्षीस ठेवण्यात आली होती वाढदिवसाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्याचे कारण म्हणजे यामधून सर्व बहुजन समाजातील लोकांना एकत्रित करून त्यांना त्यांच्या अडीअडचणीमध्ये धावून जाणे व त्यांच्या समस्या जाणून घेणे हा मूळ उद्देश होता हा उद्देश या माध्यमातून पार झाला असे दिसून येत आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये ईगल स्पोर्ट्स रांजणी ने प्रथम क्रमांक मिळवला व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जिव्हाळा  हातीत या संघाने पटकवला व तृतीय क्रमांक उगार स्पोर्ट्स उगार आणि चतुर्थ क्रमांक सिद्धांत स्पोर्ट्स मिरज यांनी पटकावला स्पर्धा अत्यंत तुरीची च्या पार पडल्या नियोजन मा डॉ. शंकरदादा माने युवा मंच कवठे महांकाळ यांच्यावतीने श्री महाकाली साखर कारखान्याचे ग्राउंड कवठे महांकाळ येते  घेण्यात आल्या

शनिवार, १९ मार्च, २०२२

जयंत पाटील

 जयंतराव साहेब नेता आमचा  सिह  गर्जे राष्टवादीचा....

लोक नेता साजे आमचा

सुपुत्र कासेगावचा.....!!१!!


विविध पदे भूषिवली त्यांनी

वाली जेनतेचा... 

पालकमंत्री हीरा कोहीणून

शोभे महाराष्टाचा...!!२!!

मित्र प्रेम युवा नेत्यांचे

 *मित्र प्रेम युवा नेत्यांचे*

कासेगावचा सुपूत्र तुम्ही

सांगली जिल्हाचा युवा नेता...

जिव लावता सगळ्यांना

कार्यक्रत्यास सोबत घेवून जाता...!!१!!


नावात तुमच्या देवराज आहे

राज्य तुमचे जनेतेच्या मनात...

हीत गुजाची गोष्ट घडते

सुःखी मित्र प्रेम वनात...!!२!!


दिलदार नेता, दिलदार दादा

हा जय घोष, तरुणांच्या मनात...

जलोष करतो तरुन सारा

नाचे आनंदाच्या भरात...!!३!!


झेंडा हाती सत कर्माचा

वसा घेई  राजारामबापूंचा....

लोक कल्याणांची धुरा घेई

आदर्श घेई जयंतराव  साहेबांचा..!!४!!


सुपुत्र जर्नाधन काकांचा

दिल्या शब्दाला जागणारा....

युवा नेता असा घडला

जनतेला प्रेम लावनारा...!!५!!


म्हणून म्हणतात देवराजदादा

सारखाच नेता हवाच मजला...

समाजकारणाची जान असनारा

जिवलग मित्र  भेटलाच मजला...!!६!!

 कवी समाजरत्न नितीनभाऊ बडेकर मु.पो.कासेगाव ता.वाळवा जि.सांगली फोन 9552233248

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

मी पण होतो दिढी वाला

 *मी पण होतो दाढी वाला*


मी पण होतो दाढी वाला

आर पार घुसवणारा....

बौद्ध आणी त्यांचा धम्म वाचला

झालो शांत बसनारा....!!१!!


मी पण होतो दाढी वाला

भर चौकात दांडक्याने फोडनारा...

चळवळीचा नाद लागला

झालो  पुस्तक वाचनारा...!!२!!


मी पण होतो दाढी वाला

छ्छडू टोकून चल ये म्हणनारा...

शाहू फुलेच विचार  घेवून

झालो क्षमा करणारा...!!४!!


मी पण होतो दाढी वाला

कपाळी भगवा फासनारा...

नडणार्‍याची भर चौकात

उभ्याने ठासनारा...!!५!!


मी पण होतो दाढी वाला

दहशत सगळीकडे गाजवणारा....

 बौद्ध धम्माची शिकवण मिळाली

झालो क्षमा शांती पेरणारा...!!६!!


मी पण होतो दाढी वाला

तापट डोक्याने विचार करणारा...

गौतम बुद्धाचा धम्म निवडला

झालो आनंद प्रेरणारा...!!७!!


मी पण होतो दाढी वाला

रागाने लाल डोळे फिरवणारा....

आता वाचतो फक्त पुस्तक

समाजसुधारनेचा धडा गिरवणारा..!!८!!

 कवी  समाजरन नितीनभाऊ बडेकर

मु.पो.कासेगाव ता.वाळवा जि.सांगली फोन 9552233248

गुरुवार, १७ मार्च, २०२२

कवीता तुला घे

 *तुला घे*


डाॅ बाबासाहेब तुला घे

शाहू फुले तुला घे...

मला फक्त त्यांचे विचार

डोक्यात घेवूदे...!!१!!


प्रा.सुकुमार कांबळे सर

तुला घे.

डाॅ.मच्छिंद्र सकटे सर

तुला घे.

प्रा.मधुकर वायदंडे सर

तुला घे....

मला फक्त  त्यांचे विचार

डोक्यात घेवू दे...!!२!!


तु राष्र्ट पुरूषांचे 

फोटो घेवून नाच...

मला मात्र त्यांचे

विचार वाचुंदे....!!३!!


सत्ता धारी तुला घे

विरोधक तुला घे..

मला मात्र त्यांचे कार्य

आमलात आनु दे...!!४!!


राजकारण तुला घे

समाज सेवा तुला घे....

मला मात्र माझे कार्य

आता तरी  करु दे...!!५!!


क्रोध राग तुला घे

मच्छर द्वेश तुला घे....

मला  धम्म शांती

आता तरी मिळुदे....!!६!!


युद्ध लढा तुला घे

रक्त रंजित इतिहास तुला घे..

मला मात्र धम्म बुध्द

आता तरी घेवूदे...!!७!!


हव तर बुध्द धम्म पण तुला घे.

शांतीचा संदेश देण्यास सोबत ये...

शरणम बुद्धम गच्छामी

आता तरी मला म्हणू दे....!!८!!


कवी  समाजरन नितीनभाऊ बडेकर मु.पो.कासेगाव ता.वाळवा जि.सांगली फोन.9552233248