शनिवार, १९ मार्च, २०२२

जयंत पाटील

 जयंतराव साहेब नेता आमचा  सिह  गर्जे राष्टवादीचा....

लोक नेता साजे आमचा

सुपुत्र कासेगावचा.....!!१!!


विविध पदे भूषिवली त्यांनी

वाली जेनतेचा... 

पालकमंत्री हीरा कोहीणून

शोभे महाराष्टाचा...!!२!!

मित्र प्रेम युवा नेत्यांचे

 *मित्र प्रेम युवा नेत्यांचे*

कासेगावचा सुपूत्र तुम्ही

सांगली जिल्हाचा युवा नेता...

जिव लावता सगळ्यांना

कार्यक्रत्यास सोबत घेवून जाता...!!१!!


नावात तुमच्या देवराज आहे

राज्य तुमचे जनेतेच्या मनात...

हीत गुजाची गोष्ट घडते

सुःखी मित्र प्रेम वनात...!!२!!


दिलदार नेता, दिलदार दादा

हा जय घोष, तरुणांच्या मनात...

जलोष करतो तरुन सारा

नाचे आनंदाच्या भरात...!!३!!


झेंडा हाती सत कर्माचा

वसा घेई  राजारामबापूंचा....

लोक कल्याणांची धुरा घेई

आदर्श घेई जयंतराव  साहेबांचा..!!४!!


सुपुत्र जर्नाधन काकांचा

दिल्या शब्दाला जागणारा....

युवा नेता असा घडला

जनतेला प्रेम लावनारा...!!५!!


म्हणून म्हणतात देवराजदादा

सारखाच नेता हवाच मजला...

समाजकारणाची जान असनारा

जिवलग मित्र  भेटलाच मजला...!!६!!

 कवी समाजरत्न नितीनभाऊ बडेकर मु.पो.कासेगाव ता.वाळवा जि.सांगली फोन 9552233248

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

मी पण होतो दिढी वाला

 *मी पण होतो दाढी वाला*


मी पण होतो दाढी वाला

आर पार घुसवणारा....

बौद्ध आणी त्यांचा धम्म वाचला

झालो शांत बसनारा....!!१!!


मी पण होतो दाढी वाला

भर चौकात दांडक्याने फोडनारा...

चळवळीचा नाद लागला

झालो  पुस्तक वाचनारा...!!२!!


मी पण होतो दाढी वाला

छ्छडू टोकून चल ये म्हणनारा...

शाहू फुलेच विचार  घेवून

झालो क्षमा करणारा...!!४!!


मी पण होतो दाढी वाला

कपाळी भगवा फासनारा...

नडणार्‍याची भर चौकात

उभ्याने ठासनारा...!!५!!


मी पण होतो दाढी वाला

दहशत सगळीकडे गाजवणारा....

 बौद्ध धम्माची शिकवण मिळाली

झालो क्षमा शांती पेरणारा...!!६!!


मी पण होतो दाढी वाला

तापट डोक्याने विचार करणारा...

गौतम बुद्धाचा धम्म निवडला

झालो आनंद प्रेरणारा...!!७!!


मी पण होतो दाढी वाला

रागाने लाल डोळे फिरवणारा....

आता वाचतो फक्त पुस्तक

समाजसुधारनेचा धडा गिरवणारा..!!८!!

 कवी  समाजरन नितीनभाऊ बडेकर

मु.पो.कासेगाव ता.वाळवा जि.सांगली फोन 9552233248

गुरुवार, १७ मार्च, २०२२

कवीता तुला घे

 *तुला घे*


डाॅ बाबासाहेब तुला घे

शाहू फुले तुला घे...

मला फक्त त्यांचे विचार

डोक्यात घेवूदे...!!१!!


प्रा.सुकुमार कांबळे सर

तुला घे.

डाॅ.मच्छिंद्र सकटे सर

तुला घे.

प्रा.मधुकर वायदंडे सर

तुला घे....

मला फक्त  त्यांचे विचार

डोक्यात घेवू दे...!!२!!


तु राष्र्ट पुरूषांचे 

फोटो घेवून नाच...

मला मात्र त्यांचे

विचार वाचुंदे....!!३!!


सत्ता धारी तुला घे

विरोधक तुला घे..

मला मात्र त्यांचे कार्य

आमलात आनु दे...!!४!!


राजकारण तुला घे

समाज सेवा तुला घे....

मला मात्र माझे कार्य

आता तरी  करु दे...!!५!!


क्रोध राग तुला घे

मच्छर द्वेश तुला घे....

मला  धम्म शांती

आता तरी मिळुदे....!!६!!


युद्ध लढा तुला घे

रक्त रंजित इतिहास तुला घे..

मला मात्र धम्म बुध्द

आता तरी घेवूदे...!!७!!


हव तर बुध्द धम्म पण तुला घे.

शांतीचा संदेश देण्यास सोबत ये...

शरणम बुद्धम गच्छामी

आता तरी मला म्हणू दे....!!८!!


कवी  समाजरन नितीनभाऊ बडेकर मु.पो.कासेगाव ता.वाळवा जि.सांगली फोन.9552233248