शुक्रवार, १८ मार्च, २०२२

मी पण होतो दिढी वाला

 *मी पण होतो दाढी वाला*


मी पण होतो दाढी वाला

आर पार घुसवणारा....

बौद्ध आणी त्यांचा धम्म वाचला

झालो शांत बसनारा....!!१!!


मी पण होतो दाढी वाला

भर चौकात दांडक्याने फोडनारा...

चळवळीचा नाद लागला

झालो  पुस्तक वाचनारा...!!२!!


मी पण होतो दाढी वाला

छ्छडू टोकून चल ये म्हणनारा...

शाहू फुलेच विचार  घेवून

झालो क्षमा करणारा...!!४!!


मी पण होतो दाढी वाला

कपाळी भगवा फासनारा...

नडणार्‍याची भर चौकात

उभ्याने ठासनारा...!!५!!


मी पण होतो दाढी वाला

दहशत सगळीकडे गाजवणारा....

 बौद्ध धम्माची शिकवण मिळाली

झालो क्षमा शांती पेरणारा...!!६!!


मी पण होतो दाढी वाला

तापट डोक्याने विचार करणारा...

गौतम बुद्धाचा धम्म निवडला

झालो आनंद प्रेरणारा...!!७!!


मी पण होतो दाढी वाला

रागाने लाल डोळे फिरवणारा....

आता वाचतो फक्त पुस्तक

समाजसुधारनेचा धडा गिरवणारा..!!८!!

 कवी  समाजरन नितीनभाऊ बडेकर

मु.पो.कासेगाव ता.वाळवा जि.सांगली फोन 9552233248

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा