*तुला घे*
डाॅ बाबासाहेब तुला घे
शाहू फुले तुला घे...
मला फक्त त्यांचे विचार
डोक्यात घेवूदे...!!१!!
प्रा.सुकुमार कांबळे सर
तुला घे.
डाॅ.मच्छिंद्र सकटे सर
तुला घे.
प्रा.मधुकर वायदंडे सर
तुला घे....
मला फक्त त्यांचे विचार
डोक्यात घेवू दे...!!२!!
तु राष्र्ट पुरूषांचे
फोटो घेवून नाच...
मला मात्र त्यांचे
विचार वाचुंदे....!!३!!
सत्ता धारी तुला घे
विरोधक तुला घे..
मला मात्र त्यांचे कार्य
आमलात आनु दे...!!४!!
राजकारण तुला घे
समाज सेवा तुला घे....
मला मात्र माझे कार्य
आता तरी करु दे...!!५!!
क्रोध राग तुला घे
मच्छर द्वेश तुला घे....
मला धम्म शांती
आता तरी मिळुदे....!!६!!
युद्ध लढा तुला घे
रक्त रंजित इतिहास तुला घे..
मला मात्र धम्म बुध्द
आता तरी घेवूदे...!!७!!
हव तर बुध्द धम्म पण तुला घे.
शांतीचा संदेश देण्यास सोबत ये...
शरणम बुद्धम गच्छामी
आता तरी मला म्हणू दे....!!८!!
कवी समाजरन नितीनभाऊ बडेकर मु.पो.कासेगाव ता.वाळवा जि.सांगली फोन.9552233248
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा